DC vs RCB, IPL 2023 Live Score Update: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची पडली तिसरी विकेट, विराट कोहली अर्धशतक करुन बाद

दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमच्या घरच्या मैदानावर खेळला जात आहे. सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्स दहाव्या क्रमांकावर आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 50 वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमच्या घरच्या मैदानावर खेळला जात आहे. सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्स दहाव्या क्रमांकावर आहे. तत्पूर्वी, एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संघ भिडले. त्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला तिसरा धक्का लागला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ स्कोअर 141/3 आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement