India Beat Afghanistan World Cup 2023: विराटच्या बालेकिल्ल्यात रोहितचा गोंधळ, 'हिटमॅन'च्या वादळी खेळीने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा, भारताचा सलग दुसरा विजय
या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 8 गडी राखुन पराभव केला.
आयसीसी विश्वचषक 2023 च्या (ICC Cricket World Cup 2023) नवव्या सामन्यात बुधवारी (11 ऑक्टोबर) दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 8 गडी राखुन पराभव केला. तत्तपुर्वी, अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतापुढे 273 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. अफगाणिस्ताकडून हशमतुल्ला शाहिदी 80 तर अजमतुल्ला उमरझाई 62 धावा केल्या. तसेच भारतीय गोलंदाजाकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 273 धावा करायच्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने 34 व्या षटाकत हा सामना संपवून विजय मिळवला. टीम इंडियाच्या वतीने कर्णधार रोहित शर्माने शानदार फलंदाजी करत 131 धावांची शानदार खेळी केली. अफगाणिस्तानकडून राशिद खानने सर्वाधिक दोन बळी घेतले. टीम इंडियाचा पुढचा सामना पाकिस्तानसोबत 14 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये होणार आहे.