IND vs SA 3rd T20I: रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 बदल

संघ व्यवस्थापनाने तिसऱ्या सामन्यातून केएल राहुल आणि विराट कोहलीला विश्रांती दिली आहे.

IND vs SA (Photo Credit - Twitter)

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा T20I सामना (India vs South Africa 3rd T20I) मंगळवारी इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने पहिले दोन सामने जिंकून मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. याशिवाय त्याने प्रथमच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका आपल्या घरच्या मैदानावर जिंकली आहे. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आज शेवटचा टी-20 सामना खेळणार आहे. संघ व्यवस्थापनाने तिसऱ्या सामन्यातून केएल राहुल आणि विराट कोहलीला विश्रांती दिली आहे. भारतीय संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले आहेत. विराट आणि राहुलशिवाय अर्शदीपही आजचा सामना खेळत नाहीये. अर्शदीपच्या जागी मोहम्मद सिराजचा तर विराट आणि राहुलच्या जागी श्रेयस अय्यर आणि उमेश यादवचा समावेश करण्यात आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif