IND vs AUS 1st Test: ड्रिंक्स ब्रेकमध्ये रोहित शर्माने जिंकली सर्वांची मने, सोशल मीडियावर होत आहे कौतुक (Watch Video)

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विकेटकीपर फलंदाज केएस भरत आणि सूर्यकुमार यादव टीम इंडियासाठी पदार्पण कसोटी सामने खेळत आहेत.

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 चा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला आहे. चार सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जात आहे. या ट्रॉफीचा हा 16वा हंगाम 10व्यांदा भारतीय भूमीवर खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विकेटकीपर फलंदाज केएस भरत आणि सूर्यकुमार यादव टीम इंडियासाठी पदार्पण कसोटी सामने खेळत आहेत. नागपूर कसोटीचे पहिले सत्र संपले आहे. उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 2 गडी गमावून 76 धावा आहे. दरम्यान, ड्रिंक्स ब्रेक दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मोहम्मद सिराजच्या बाटलीतील पाणी पिले. रोहित शर्माच्या या हावभावाने पुन्हा एकदा सोशल मीडियावर त्याचे जोरदार कौतुक होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement