IND vs SA Series 2023: मोठी बातमी! दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी Rohit Sharma करणार टी-20 संघाचे नेतृत्व तर KL Rahul करणार वनडे संघाचे नेतृत्व

भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेसोबत वनडे, कसोटी आणि टी-20 मालिका खेळायची आहे. ज्यासाठी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आज टीम इंडियाची घोषणा करू शकते.

IND vs SA Series 2023: मोठी बातमी! दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी Rohit Sharma करणार टी-20 संघाचे नेतृत्व तर KL Rahul करणार वनडे संघाचे नेतृत्व
केएल राहुल आणि रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

सध्या भारतीय संघ (Team India) ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील आतापर्यंत तीन सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारताने 2 तर ऑस्ट्रेलियाने एक सामना जिंकला आहे. या मालिकेनंतर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेसोबत वनडे, कसोटी आणि टी-20 मालिका खेळायची आहे. ज्यासाठी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आज टीम इंडियाची घोषणा करू शकते. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) टी-20 संघाचे नेतृत्व करणार आहे तर केएल राहुल (KL Rahul) वनडे संघाचे नेतृत्व करणार आहे. (हे देखील वाचा: India vs South Africa: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतातून 45 खेळाडू जाणार, बीसीसीआयने व्हिसासाठी केला अर्ज)

पाहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 30, 2023 06:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).