India vs South Africa: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतातून 45 खेळाडू जाणार, बीसीसीआयने व्हिसासाठी केला अर्ज

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आज टीम इंडियाची घोषणा करू शकते. त्यामुळे टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी आपला मजबूत संघ निवडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

India vs South Africa: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतातून 45 खेळाडू जाणार, बीसीसीआयने व्हिसासाठी केला अर्ज
Team India (Photo Credit - Twitter)

IND vs SA Series 2023: सध्या भारतीय संघाला (Team India) ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील आतापर्यंत तीन सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारताने 2 तर ऑस्ट्रेलियाने एक सामना जिंकला आहे. या मालिकेनंतर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेसोबत वनडे, कसोटी आणि टी-20 मालिका खेळायची आहे. ज्यासाठी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आज टीम इंडियाची घोषणा करू शकते. त्यामुळे टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी आपला मजबूत संघ निवडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी 45 खेळाडूंची निवड केली आहे. (हे देखील वाचा: IND vs AUS 4th T20 Pitch Report: रायपूरच्या मैदानावर पहिल्यांदाच होणार टी-20 आंतरराष्ट्रीय सामना, जाणून घ्या कसा असेल खेळपट्टीचा अहवाल)

पाहा ट्विट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 30, 2023 05:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).