Rohit Sharma Half Century: रोहित शर्माने शानदार अर्धशतक झळकावले, चेन्नई सुपर किंग्ज तिसऱ्या विकेटच्या शोधात
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्ससमोर 207 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सीएसकेकडून ऋतुराज गायकवाडने 69, शिवम दुबे 66 धावांची आक्रमक खेळी केली. तर, मुंबईकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक दोन बळी घेतले.
MI vs CSK, IPL 2024 29th Match: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 29 वा (IPL 2024) सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (MI vs CSK) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. या मोसमात दोन्ही संघ प्रथमच एकमेकांविरुद्ध खेळायला आले आहेत. गेल्या 5 सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्जने चार सामने जिंकले आहेत तर मुंबई इंडियन्सला केवळ एकच सामना जिंकता आला आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्ससमोर 207 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सीएसकेकडून ऋतुराज गायकवाडने 69, शिवम दुबे 66 धावांची आक्रमक खेळी केली. तर, मुंबईकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्स संघाला 20 षटकात 207 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईचा स्टार रोहित शर्माने अर्धशतक झळकावले आहे. मुंबईचा स्कोर 86/2
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)