Rohit Sharma ने मेहुण्याच्या लग्नात केली धमाल, पत्नी रितिकासोबत डीजेवर केला जबरदस्त डान्स (Watch Video)
मेहुण्याच्या लग्नात हिटमॅनने पत्नी रितिकासोबत जबरदस्त डान्स केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला वनडे खेळणार नाही. कारण रोहित शर्माने आपल्या मेहुण्याच्या लग्नाला हजेरी लावली होती. मेहुण्याच्या लग्नात हिटमॅनने पत्नी रितिकासोबत जबरदस्त डान्स केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोहित शर्माने पत्नी रितिकासोबत डान्स फ्लोअरवर जोरदार डान्स केला. रोहितने काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये पंजाबी गाण्यावर डान्स केला. दोघांच्या डान्स व्हिडिओला लोक पसंत करत आहेत, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)