Rohit Sharma Fifty: रोहित शर्माने 36 चेंडूत ठोकले अर्धशतक, भारचाची दमदार सुरुवात
दोन्ही संघ या स्पर्धेतील तिसऱ्या विजयावर आहेत. भारत आणि पाकिस्तानने प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही जिंकले आहेत.
एकदिवसीय विश्वचषकाच्या 12व्या सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी (IND vs PAK) होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Stadium) खेळवला जात आहे. या सामन्याद्वारे टीम इंडिया वनडे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सलग आठव्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकूण सात वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाने प्रत्येक वेळी विजय मिळवला आहे. दोन्ही संघ या स्पर्धेतील तिसऱ्या विजयावर आहेत. भारत आणि पाकिस्तानने प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही जिंकले आहेत. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करत असलेल्या पाकिस्तानने भारतासमोर 192 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पाकिस्तानकडून बाबर आझम 50 आणि मोहम्मद रिझवानने 49 सार्वाधिक धावा केल्या. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 192 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्माने 36 चेंडूत ठोकले अर्धशतक ठोकले आहे. भारताचा स्कोर 99/2