IND vs AUS 1st T20I: डीआरएस रिव्ह्यूदरम्यान रोहित शर्माने पकडली दिनेश कार्तिकची मान; नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर शेअर केले फनी मीम्स
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या संघाने हे लक्ष्य 19.2 षटकांत पार केले. या सामन्यात गोलंदाजाची खराब कामगिरी पाहायला मिळाली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 4 गडी राखून पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ऑस्ट्रेलियासमोर 209 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या संघाने हे लक्ष्य 19.2 षटकांत पार केले. या सामन्यात गोलंदाजाची खराब कामगिरी पाहायला मिळाली. तसेच सामन्यादरम्यान रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांच्यातील एका क्षणाने इंटरनेटवर तुफान चर्चा केली. ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या 12व्या षटकात, मैदानावरील पंचाने ग्लेन मॅक्सवेलला नॉट आऊट दिल्यानंतर भारताने डीआरएस मागणी केली. जेव्हा, निकाल भारताच्या बाजूने लागला, तेव्हा रोहित कार्तिकची मान पकडताना दिसला, ज्यामुळे ट्विटरवर नेटकऱ्यांनी मजेदार मीम्स तयार केले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)