Rohit Sharma New Record: रोहित शर्माने सातवे शतक झळकावून इतिहास रचला, सचिन तेंडुलकरचा विक्रम काढला मोडीत
रोहितने अवघ्या 63 चेंडूत शतक झळकावले आहे. या शतकासह रोहित विश्वचषकात सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे. या विक्रमात त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे.
भारत विरुद्ध अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील सामन्यात रोहित शर्माने (Rohit Sharma) अनेक विक्रम केले आहेत. या सामन्यात रोहित शर्माने शानदार शतक झळकावले आहे. रोहितने अवघ्या 63 चेंडूत शतक झळकावले आहे. या शतकासह रोहित विश्वचषकात सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे. या विक्रमात त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. या शतकापूर्वी रोहित आणि सचिन दोघेही 6 शतके झळकावताना बरोबरीत होते, पण आता रोहितने वर्ल्ड कपमध्ये 7 शतके ठोकली आहेत. याशिवाय रोहितने वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी सर्वात वेगवान शतकही झळकावले आहे. याआधी हा विक्रम कपिल देवच्या नावावर होता, त्याने विश्वचषकात 72 चेंडूत शतक झळकावले होते. आता रोहितने अवघ्या 63 चेंडूत शतक पूर्ण केले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)