Rohit Sharma ने मोडला Yuvraj Singh चा विक्रम, T20 विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणारा ठरला भारतीय खेळाडू

रोहितने 39 चेंडूत 53 धावांची खेळी केली. रोहितने आपल्या खेळीत चार चौकार आणि तीन षटकार मारले.

Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

T20 विश्वचषकाच्या इतिहासात ख्रिस गेल हा एकमेव फलंदाज आहे ज्याने 50 हून अधिक षटकार ठोकले आहेत. या यादीत 63 षटकारांसह गेल अव्वल असून आता रोहित शर्मा (Rohit Sharma) दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. रोहित शर्माने नेदरलँडविरुद्ध तिसरा षटकार मारताच त्याने युवराज सिंहला मागे सोडले. रोहितने 39 चेंडूत 53 धावांची खेळी केली. रोहितने आपल्या खेळीत चार चौकार आणि तीन षटकार मारले. T20 वर्ल्ड कपबद्दल बोलायचे झाले तर रोहित सर्वाधिक षटकारांच्या बाबतीत ख्रिस गेलपेक्षा खूप मागे आहे, पण हा विक्रम मोडण्याची ताकद त्याच्यात नक्कीच आहे. या सामन्यासह रोहित फॉर्ममध्ये परतला असून त्याचा फॉर्मही टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)