Ashes 2023: अॅशेस कसोटीदरम्यान लॉर्ड्सवर गोंधळ, आंदोलक खेळपट्टी खराब करण्यासाठी मैदानात घुसले; जॉनी बेअरस्टोने त्यांना उचलून काढले मैदानाबाहेर (Watch Video)

मात्र याचदरम्यान इंग्लंडचा स्टार खेळाडू जॉनी बेअरस्टो याने एका आंदोलकाला पकडले आणि त्याला उचलून मैदानाबाहेर नेले. त्यानंतर सुरक्षा रक्षकाने आंदोलकाला मैदानातून बाहेर काढले.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) यांच्यात सध्या अॅशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला (Ashes 2023) जात आहे. लंडनमधील लॉर्ड्स स्टेडियमवर हा सामना सुरू आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी (28 जून) मैदानावर प्रचंड गोंधळ झाला. दोन आंदोलक थेट मैदानात घुसले आणि त्यांच्या हातात केशरी रंग किंवा चिकणमातीसारखे काहीतरी होते, ज्यातून ते खेळपट्टी खराब करण्यासाठी वेगाने पुढे जात होते. मात्र याचदरम्यान इंग्लंडचा स्टार खेळाडू जॉनी बेअरस्टो याने एका आंदोलकाला पकडले आणि त्याला उचलून मैदानाबाहेर नेले. त्यानंतर सुरक्षा रक्षकाने आंदोलकाला मैदानातून बाहेर काढले. या वेळी दुसरा आंदोलक खेळपट्टी खराब करण्यासाठी वेगाने पुढे सरकला असला तरी खेळाडू आणि रक्षकांनी त्याला रोखले. दरम्यान, आंदोलकाकडे असलेला केशरी रंग किंवा मातीसारखे काहीतरी जमिनीवर पडले. ते लगेच साफ करण्यात आले. या संपूर्ण घटनेत जॉनी बेअरस्टोच्या कपड्यांचेही नुकसान झाले. बेअरस्टो ताबडतोब मैदानाबाहेर गेला आणि टी-शर्ट बदलून लगेच ड्रेसिंग रूममधून परतला. सध्या त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)