Rinku Singh Smashes 5 Sixes Off 5 Balls: रिंकू सिंगने 5 चेंडूत पाच षटकार मारत कोलकाता नाईट रायडर्सला मिळवून दिला दणदणीत विजय, पहा व्हिडिओ

या सामन्यात रिंकू सिंगच्या बॅटने 21 चेंडूत 48 धावांची स्फोटक खेळी केली. शेवटच्या चेंडूवर केकेआरला विजयासाठी 4 धावांची गरज होती आणि हा चेंडू षटकारापर्यंत पोहोचवत संघाला रोमहर्षक विजय मिळवून देण्याचे काम रिंकू सिंगने केले.

इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या मोसमातील 13वा साखळी सामना अतिशय रोमांचक होता, ज्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने गतविजेत्या गुजरात टायटन्ससमोर 20 षटकांत 7 गडी गमावून 205 धावांचे आव्हान पूर्ण केले. या सामन्यात कोलकाता संघाला शेवटच्या षटकात विजयासाठी 29 धावांची गरज होती, त्यात पहिल्या चेंडूवर एकेरी झळकावल्यानंतर रिंकू सिंगने (Rinku Singh) पुढच्या 5 चेंडूत सलग 5 षटकार ठोकत संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. या सामन्यात रिंकू सिंगच्या बॅटने 21 चेंडूत 48 धावांची स्फोटक खेळी केली. शेवटच्या चेंडूवर केकेआरला विजयासाठी 4 धावांची गरज होती आणि हा चेंडू षटकारापर्यंत पोहोचवत संघाला रोमहर्षक विजय मिळवून देण्याचे काम रिंकू सिंगने केले.

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement