RCB vs GT, IPL 2024 Live Score Update: आरसीबीचा डाव कोलमडला, ग्रीन नंतर कोहलीही बाद, जोशुआ लिटलने केला कहर
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पाचवा मोठा धक्का बसला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा स्कोअर 107/5
RCB vs GT, IPL 2024 52th Match: आयपीएल 2024 चा 52 वा (IPL 2024) सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स (RCB vs GT) यांच्यात बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांच्या 10 पैकी 3 सामने जिंकले आहेत, तर 7 गमावले आहेत. ते पॉइंट टेबलच्या तळाशी आहेत. दुसरीकडे, गिलच्या नेतृत्वाखालील संघाने 10 पैकी 4 सामने जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत. ते 8 गुणांसह गुणतालिकेत 8व्या स्थानावर आहेत. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने नाणेफेक जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरात टायटन्सचा संपूर्ण संघ 19.3 षटकांत अवघ्या 147 धावा करून अपयशी ठरला. गुजरात टायटन्ससाठी शाहरुख खानने सर्वाधिक 37 धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी विजयकुमार विशाक, मोहम्मद सिराज आणि यश दयाल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला 20 षटकात 148 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला सहावा मोठा धक्का बसला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा स्कोअर 111/6
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)