SRH vs RCB , IPL 2023 Match 65: आरसीबीने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर (Rajiv Gandhi International Stadium) संध्याकाळी 7.30 पासून हा सामना खेळला जाईल.
इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) चा 65 वा सामना आज सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (SRH vs RCB) यांच्यात होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर (Rajiv Gandhi International Stadium) संध्याकाळी 7.30 पासून हा सामना खेळला जाईल. दोन्ही संघांमधील या मोसमातील ही पहिलीच भेट असेल. दोन्ही संघांमध्ये आज रोमांचक सामना रंगणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी हा करा किंवा मरो असा सामना असेल. या सामन्याद्वारे दोन्ही संघ आपापल्या 13व्या सामन्यात खेळतील. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आतापर्यंत 6 सामने आणि सनरायझर्स हैदराबादने 4 सामने जिंकले आहेत. दरम्यान, आरसीबीने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, अनुज रावत (विकेटकीपर), शाहबाज अहमद, मायकेल ब्रेसवेल, वेन पारनेल, हर्षल पटेल, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, कार्तिक त्यागी, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार, नितीश रेड्डी
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)