RCB vs SRH, IPL 2024 Toss Update: आरसीबीने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
आरसीबीने आयपीएल 2024 मध्ये 6 पैकी 5 सामने गमावले आहेत आणि फक्त 1 सामना जिंकला आहे. यासह, ते 2 गुणांसह गुणतालिकेत तळाच्या 10व्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, हैदराबादने 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत, तर 2 सामने गमावले आहेत. ते 6 गुणांसह गुणतालिकेत 5 व्या क्रमांकावर आहेत.
RCB vs SRH, IPL 2024: आयपीएल 2024 मध्ये (IPL 2024) आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद (RCB vs SRH) यांच्यात बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 सामना खेळवला जाणार आहे. आरसीबीने आयपीएल 2024 मध्ये 6 पैकी 5 सामने गमावले आहेत आणि फक्त 1 सामना जिंकला आहे. यासह, ते 2 गुणांसह गुणतालिकेत तळाच्या 10व्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, हैदराबादने 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत, तर 2 सामने गमावले आहेत. ते 6 गुणांसह गुणतालिकेत 5 व्या क्रमांकावर आहेत. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, सौरव चौहान, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, विजयकुमार विशक, रीस टोपले, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल