RCB vs KKR Live Streaming Online: आजच्या सामन्यात बंगलोर भिडणार कोलकाता नाईट रायडर्स सोबत, घरबसल्या कुठे पाहणार लाइव्ह घ्या जाणून

आता आजचा सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान, हा सामना संध्याकाळी 7.30 पासून सुरू होईल.

आयपीएल 2023 चा 36 वा सामना बुधवार, 26 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स (RCB vs KKR) यांच्यात होणार आहे. या हंगामाच्या सुरुवातीला दोन्ही संघ आमनेसामने आले होते ज्यात केकेआरने 81 धावांनी विजय मिळवला होता. तो सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला गेला. तिथली खेळपट्टी अनेकदा फिरकीसाठी उपयुक्त ठरते. आता आजचा सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान, हा सामना संध्याकाळी 7.30 पासून सुरू होईल. याशिवाय लाइव्ह स्ट्रिमिंगबद्दल सांगायचे तर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर तुम्ही हा सामना थेट पाहू शकता. तुम्ही OTT वर Jio Cinema द्वारे हिंदी, इंग्रजी, तेलगू, भोजपुरी अशा अनेक भाषांमध्ये सामन्याचा आनंद घेऊ शकता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now