RCB vs KKR, IPL 2022 Match 6: कोलकाताचं कंबरडं मोडत हर्षल पटेल याची कमाल, सहकारी मोहम्मद सिराजच्या विक्रमाशी केली बरोबरी
IPL 2022, RCB vs KKR: कोलकाता नाईट रायडर्स संघाला 18.5 षटकांत 128 धावांत गुंडाळण्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या हर्षल पटेलने 2 विकेट्स घेतल्या आणि 2 मेडन्स टाकल्या. असे केल्याने, आयपीएलच्या इतिहासात एका डावात 2 मेडन ओव्हर टाकणारा हर्षल हा केवळ दुसरा गोलंदाज ठरला. हर्षलने त्याचा सहकारी मोहम्मद सिराजच्या आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक मेडन टाकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली.
RCB vs KKR, IPL 2022 Match 6: एका आयपीएल (IPL) सामन्यात दोन मेडन ओव्हर टाकणारा मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) नंतर हर्षल पटेल (Harshal Patel) हा दुसरा गोलंदाज ठरला आहे. बुधवारी डीवाय पाटील स्टेडियमवर आयपीएल 2022 च्या सहाव्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (Kolkata Knight Riders) त्याने ही कामगिरी केली. योगायोगाने सिराजने अशीच कामगिरी आयपीएल 2020 मध्ये केकेआरविरुद्ध केली होती.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)