RCB vs KKR IPL 2021 Match 10: Glenn Maxwell, एबी डिव्हिलियर्स यांची जबरा फलंदाजी, आरसीबीने केला 204 धावांचा डोंगर; नाईट रायडर्सपुढे कठीण टार्गेट

मॅक्सवेलने सर्वाधिक 78 धावा केल्या तर डिव्हिलियर्सने नाबाद 76 धावा केल्या. 

ग्लेन मॅक्सवेल (Photo Credit: Twitter/@IPL)

RCB vs KKR IPL 2021 Match 10: कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (Kolkata Knight Riders) चेपॉक (Chepauk) स्टेडियमवर सुरु असलेल्या आयपीएलच्या 10व्या सामन्यात 20 ओव्हरमध्ये ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) यांच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) 4 विकेट गमावून 204 धावांचा डोंगर उभारला आहे. मॅक्सवेलने सर्वाधिक 78 धावा केल्या तर डिव्हिलियर्सने नाबाद 76 धावा आणि देवदत्त पडिक्क्लने 25 धावांचे योगदान दिले. कोलकाताकडून वरुण चक्रवर्तीने 2 तर पॅट कमिन्स आणि प्रसिद्ध कृष्णा यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)