MI vs RCB IPL 2024 Live Score Update: आरसीबीने मुंबईला दिला पहिला मोठा धक्का, ईशान 69 धावा करून बाद

17 व्या मोसमात मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू नवव्या स्थानावर आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकला असून आणखी एका विजयाच्या शोधात आहेत.

MI vs RCB IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) च्या 25 व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी (MI vs RCB) होत आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. 17 व्या मोसमात मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू नवव्या स्थानावर आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकला असून आणखी एका विजयाच्या शोधात आहेत. दरम्यान, मुंबईने टाॅस जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना आरसीबीने मुंबईसमोर 196 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आरसीबीकडून पाटीदार 50, फाफ 61 आणि दिनेश कार्तिकने सर्वाधिक धावा केल्या. तर मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईला पहिला धक्का लागला आहे. मुंबईचा स्कोर 101/1

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now