Ravindra Jadeja New Record: संजू सॅमसनला बाद करून रवींद्र जडेजाने रचला इतिहास, मोठे दिग्गजही करू शकले नाहीत हा पराक्रम

राजस्थान रॉयल्सविरुद्ध रवींद्र जडेजा आपल्या डावातील 9वे षटक टाकण्यासाठी आला होता. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर सेटचा फलंदाज देवदत्त पडिक्कलला रवींद्र जडेजाने बाद केले.

आज इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 17वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना झाला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा 3 धावांनी पराभव केला आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सविरुद्ध रवींद्र जडेजा आपल्या डावातील 9वे षटक टाकण्यासाठी आला होता. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर सेटचा फलंदाज देवदत्त पडिक्कलला रवींद्र जडेजाने बाद केले. यानंतर त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर रवींद्र जडेजाने राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला एका अप्रतिम चेंडूवर त्रिफळाचीत केले. संजू सॅमसन खाते न उघडताच बाद झाला. या विकेटसह रवींद्र जडेजाने टी-20 क्रिकेटमध्ये 200 विकेट पूर्ण केल्या आहेत. रवींद्र जडेजाने आपल्या कारकिर्दीतील 296 व्या सामन्यात हा पराक्रम केला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement