Rashid Khan Hits 10 Sixes: करामति राशिद खानने 21 चेंडूत झळकावले अर्धशतक, ठोकले 10 मोठे षटकार; पहा व्हिडिओ
गुजरात टायटन्सच्या रशीद खानने आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच मैलाचा दगड गाठला. राशिद खानने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतक 21 चेंडूत झळकावले. या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमावून 218 धावा केल्या.
इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या मोसमातील शुक्रवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळलेला 57वा सामना राशिद खानसाठी (Rashid Khan) संस्मरणीय ठरला. गुजरात टायटन्सच्या रशीद खानने आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच मैलाचा दगड गाठला. राशिद खानने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतक 21 चेंडूत झळकावले. या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमावून 218 धावा केल्या. 219 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची सुरुवात चांगली झाली नाही. गुजरातला 100 धावाही करता येणार नाहीत, असे एका क्षणी वाटत होते. मात्र राशिद खानने आपल्या फलंदाजीने सामन्याचा संपूर्ण मार्गच बदलून टाकला. राशिद खानने आपल्या धडाकेबाज खेळीत 10 मोठे षटकार ठोकले. राशिद खानने शेवटच्या षटकात तीन मोठे षटकार ठोकले.
पहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)