RR vs LSG, IPL 2023 Match 26 Live Score Update: राजस्थानने लखनौविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पाहा दोन्ही संघ

विजयाची हॅट्ट्रिक करणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाला लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात आपले वर्चस्व कायम राखायचे आहे. या सामन्याद्वारे दोन्ही संघ आपापल्या मोसमातील सहावा सामना खेळणार आहेत.

इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 26 वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स (RR vs LSG) यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जात आहे. विजयाची हॅट्ट्रिक करणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाला लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात आपले वर्चस्व कायम राखायचे आहे. या सामन्याद्वारे दोन्ही संघ आपापल्या मोसमातील सहावा सामना खेळणार आहेत. राजस्थानने आतापर्यंत 5 पैकी 4 सामने जिंकले आहेत, तर लखनौने 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

लखनौ सुपर जायंट्स: केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बडोनी, आवेश खान, युधवीर सिंग चरक, नवीन उल हक, रवी बिश्नोई.

राजस्थान रॉयल्स: जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, जेसन होल्डर, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now