RR vs PBKS, IPL 2024 Toss Update: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

दोन्ही संघांमधील हा सामना गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. पंजाब किंग्ज आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने प्लेऑफसाठी जवळपास पात्रता मिळवली आहे.

PBKS vs RR (Photo Credit - X)

RR vs PBKS, IPL 2024 65th Match: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 65 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज (RR vs PBKS) यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. पंजाब किंग्ज आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने प्लेऑफसाठी जवळपास पात्रता मिळवली आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनवर एक नजर

राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान, युझवेंद्र चहल.

पंजाब किंग्ज: प्रभसिमरन सिंग, जॉनी बेअरस्टो, रिले रोसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), सॅम कुरन (कर्णधार), हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, नॅथन एलिस, राहुल चहर, अर्शदीप सिंग.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now