IPL 2023 Point Table: राजस्थाने कोलकात्याचा नऊ गडी राखून केला पराभव; ईथे पहा पॉइंट टेबलची स्थिती

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून इडन गार्डन्सवर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताने 20 षटकांत आठ गडी गमावून 149 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने 13.1 षटकात 1 गडी गमावत 151 धावा करत सामना जिंकला.

आयपीएलच्या 56 व्या (IPL 2023) सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा (RR vs KKR) नऊ विकेट्सने पराभव केला. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून इडन गार्डन्सवर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताने 20 षटकांत आठ गडी गमावून 149 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने 13.1 षटकात 1 गडी गमावत 151 धावा करत सामना जिंकला. त्याच्यासाठी यशस्वी जैस्वालने नाबाद 98 आणि कर्णधार संजू सॅमसनने नाबाद 48 धावा केल्या. या विजयासह ते टॉप-4 मध्ये परतले आहे. राजस्थानचा 12 सामन्यांमधला हा सहावा विजय आहे. त्यांनी 12 गुण मिळवले आहेत. राजस्थान आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यांनी मुंबई इंडियन्सला चौथ्या आणि लखनौ सुपरजायंट्सला पाचव्या स्थानावर ढकलले. दुसरीकडे, कोलकाता संघ 12 सामन्यांतील सातव्या पराभवासह सातव्या स्थानावर घसरला आहे. त्यांना 10 गुण आहेत. कोलकात्याला प्लेऑफमध्ये पोहोचणे आता कठीण झाले आहे.

ईथे पहा पॉइंट टेबलची स्थिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement