IPL 2023 Final Live Update: अहमदाबादमध्ये पाऊस थांबला, कव्हर काढले; लवकरच सामना सुरू होण्याची शक्यता
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्स संघाने निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 214 धावा केल्या
इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या मोसमाचा अंतिम सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (Chennai Super King vs Gujarat Titans) यांच्यात खेळला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Stadium) दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्स संघाने निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 214 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून साई सुदर्शनने सर्वाधिक 96 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जकडून मथिशा पाथिरानाने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाला 20 षटकात 215 धावा करायच्या आहेत. अहमदाबादमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे सामना थांबवण्यात आला आहे. चेन्नईच्या डावात तीन चेंडू खेळले गेले आहेत. खेळ थांबेपर्यंत सीएसकेची धावसंख्या 0.3 षटकात एकही बाद न होता चार धावा आहे.