RCB vs CSK, IPL 2024 Live Score Update: बंगळुरू-चेन्नई सामन्यात पावसाला सुरुवात, मैदान कव्हरने झाकले, आरसीबीचा स्कोअर 31/0

हा सामना दोन्ही संघांसाठी नॉकआऊट सामना असेल, त्यामुळे या सामन्यात उत्कंठा भरलेली असेल. आजच्या सामन्यात आरसीबीने सीएसकेला पराभूत केले आणि चांगला नेट रनरेट केला तर ते प्लेऑफसाठी पात्र ठरतील.

Photo Credit - X

RCB vs CSK, IPL 2024: आयपीएल 2024 चा 68 वा सामना (IPL 2024) चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (CSK vs RCB) यांच्यात चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी नॉकआऊट सामना असेल, त्यामुळे या सामन्यात उत्कंठा भरलेली असेल. आजच्या सामन्यात आरसीबीने सीएसकेला पराभूत केले आणि चांगला नेट रनरेट केला तर ते प्लेऑफसाठी पात्र ठरतील. दरम्यान, चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. बंगळुरू आणि चेन्नई यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात पावसाने हजेरी लावली आहे. सामना मध्यंतरी थांबवण्यात आला आहे. विराट कोहली 19 धावांवर नाबाद तर फाफ डुप्लेसिस 12 धावांवर नाबाद खेळत आहे. तीन षटकांनंतर संघाची धावसंख्या 31/0 आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement