R Ashwin New Record: आर अश्विनने विकेट्सचे शतक झळकावले, इंग्लंडविरुद्ध केली 'ही' मोठी कामगिरी
त्यावेळी बेअरस्टो 38 धावांवर खेळत होता. या विकेटसह इंग्लंडला पहिल्या सत्रातच चौथा धक्का बसला. रवी अश्विनने इंग्लंडविरुद्ध 100 बळी पूर्ण केले आहेत.
IND vs ENG 4th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात (IND vs ENG 4th Test) अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने (R Ashwin) मोठी कामगिरी केली आहे. या फिरकी गोलंदाजाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत 100 बळी पूर्ण केले आहेत. यासह अश्विन महान खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. अश्विनने रांचीमध्ये सुरू असलेल्या सामन्यात जॉनी बेअरस्टोला पायचीत बाद करून ही कामगिरी केली. त्यावेळी बेअरस्टो 38 धावांवर खेळत होता. या विकेटसह इंग्लंडला पहिल्या सत्रातच चौथा धक्का बसला. रवी अश्विनने इंग्लंडविरुद्ध 100 बळी पूर्ण केले आहेत. याशिवाय त्याने या संघाविरुद्ध 1085 धावा केल्या आहेत. एकाच संघाविरुद्ध अशी कामगिरी करणारा तो जगातील सातवा खेळाडू ठरला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)