MI vs PBKS, IPL 2023 Match 31 Live Score Update: पंजाबने मुंबईला दिले 215 धावांचे लक्ष्य, शेवटच्या पाच षटकात 96 धावा, सॅम-हरप्रीतचे तुफान
दोन्ही संघांमध्ये हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने आतापर्यंत खेळलेल्या 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत.
इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 31वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमध्ये हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने आतापर्यंत खेळलेल्या 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर पंजाबने 6 पैकी 3 सामने खेळले आहेत. शेवटचा सामना मुंबईने जिंकला होता. त्यामुळे तिला विजयी घोडदौड सुरू ठेवायला आवडेल. गेल्या सामन्यात पंजाबला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्ज संघाने निर्धारित 20 षटकांत आठ गडी गमावून 214 धावा केल्या. पंजाब किंग्जकडून कर्णधार सॅम करनने सर्वाधिक 55 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून पियुष चावला आणि कॅमेरून ग्रीनने प्रत्येकी दोन गडी बाद केले. हा सामना जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्सला 20 षटकात 215 धावा करायच्या आहेत.