MI vs PBKS Live Streaming Online: मुंबई इंडियन्ससमोर पंजाब किंग्जचे आव्हान, कधी - कुठे पाहणार लाइव्ह घ्या जाणून

या सामन्यात रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहे. त्याचबरोबर पंजाब किंग्जची कमान शिखर धवनच्या हाती आहे. धवन खेळण्याची खात्री नसली तरी त्याच्या जागी सॅम कुरन कर्णधारपद भूषवू शकतो. या सामन्यात मुंबई इंडियन्सला आपली विजयी घोडदौड कायम ठेवायची आहे.

PBKS VS MI (Photo Credit - Twitter)

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2023) दररोज अनेक शानदार सामने पाहायला मिळत आहेत. या भागात शनिवारी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज (MI vs PBKS) यांच्यात सामना होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल, या सामन्यात रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहे. त्याचबरोबर पंजाब किंग्जची कमान शिखर धवनच्या हाती आहे. धवन खेळण्याची खात्री नसली तरी त्याच्या जागी सॅम कुरन कर्णधारपद भूषवू शकतो. या सामन्यात मुंबई इंडियन्सला आपली विजयी घोडदौड कायम ठेवायची आहे. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या पराभवानंतर पंजाब किंग्जला पुन्हा उसळी मारायची आहे. दरम्यान, या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर विविध भाषांमध्ये केले जाणार आहे. लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अॅपवर उपलब्ध असेल. येथे इंग्रजी तसेच इतर भारतीय भाषांमध्ये कॉमेंट्री ऐकण्याचा पर्याय आहे. हा सामना Jio Cinema अॅपवर विनामूल्य पाहता येईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement