MI vs PBKS, IPL 2023 Match 31 Live Score Update: रोमहर्षक सामन्यात पंजाबने केला मुंबईचा 13 धावांनी पराभव, अर्शदीपने शेवटच्या षटकात घेतले दोन बळी

दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्स संघाचा 13 धावांनी पराभव केला आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 31वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्स संघाचा 13 धावांनी पराभव केला आहे. तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्ज संघाने निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 214 धावा केल्या. पंजाब किंग्जकडून कर्णधार सॅम करनने सर्वाधिक 55 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून पियुष चावला आणि कॅमेरून ग्रीनने प्रत्येकी दोन गडी बाद केले. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचा संघ 20 षटकांत 6 गडी गमावून 201 धावाच करू शकला. मुंबई इंडियन्सकडून कॅमेरून ग्रीनने सर्वाधिक 67 धावा केल्या. पंजाब किंग्जकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक चार विकेट घेतले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement