PM Modi Congratulates Team India: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधान मोदीनी भारतीय संघाचे केले कौतुक, विराट कोहलीला दिल्या शुभेच्छा
कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात वर्ल्ड कप 2023 चा 37 वा (ICC Cricket World Cup 2023) सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 243 धावांनी पराभव करत विजयी घोडदौड सुरू ठेवली.
कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात वर्ल्ड कप 2023 चा 37 वा (ICC Cricket World Cup 2023) सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 243 धावांनी पराभव करत विजयी घोडदौड सुरू ठेवली. याआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने निर्धारित 50 षटकांत 5 गडी गमावून 326 धावा केल्या. टीम इंडियासाठी स्टार फलंदाज विराट कोहलीने 101 नाबाद धावांची शानदार खेळी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 27.1 षटकांत केवळ 83 धावा करून अपयशी ठरला. टीम इंडियासाठी स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. या मोठ्या विजयानंतर पंतप्रधान मोदीनी भारतीय संघाचे कौतुक केले आहे. ते म्हणाले 'आमचा क्रिकेट संघ पुन्हा एकदा विजयी! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शानदार कामगिरीबद्दल संघाचे अभिनंदन. ग्रेट टीमवर्क. आज एक सुंदर इनिंग खेळणाऱ्या विराट कोहलीलाही त्यांनी वाढदिवसाची मोठी भेट दिली आहे.' (हे देखील वाचा: Virat Kohli Dancing On Ground: विराट कोहलीच्या डान्सने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, आयसीसीने शेअर केला व्हिडिओ)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)