PBKS vs MI IPL 2021 Match 17: रोहित शर्माचे झुंजार अर्धशतक, हार्दिक पांड्याचा ‘फ्लॉप शो’; पंजाबला विजयासाठी 132 धावांचं लक्ष्य

पंजाब किंग्स विरोधात चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर सुरु असलेल्या आयपीएल सामन्यात मुंबई इंडियन्सने पहिले फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 131 धावा केल्या आणि पंजाबला विजयासाठी 132 धावांचं लक्ष्य दिलं आहे. मुंबईसाठी कर्णधार रोहित शर्माने 52 चेंडूत 63 धावांची झुंजार अर्धशतकी खेळी केली.

मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्मा (Photo Credit: Twitter/@IPL)

PBKS vs MI IPL 2021 Match 17: पंजाब किंग्स (Punjab Kings) विरोधात चेन्नईच्या (Chennai) एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर सुरु असलेल्या आयपीएल सामन्यात मुंबई इंडियन्सने  (Mumbai Indians) पहिले फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 131 धावा केल्या आणि पंजाबला विजयासाठी 132 धावांचं लक्ष्य दिलं आहे. मुंबईसाठी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) 52 चेंडूत 63 धावांची झुंजार अर्धशतकी खेळी केली. सूर्यकुमार यादवने 33 धावांचे योगदान दिले. किरोन पोलार्ड 16 धावा करून नाबाद परतला. आजच्या सामन्यात मुंबईसाठी हार्दिक पांड्याचा फ्लॉप शो सुरूच राहिला. हार्दिक आज 1 धाव करून तंबुत परतला. दुसरीकडे, पंजाबसाठी रवि बिश्नोई (Ravi Bishnoi) आणि मोहम्मद शमीने सर्वाधिक 2 तर दीपक हुड्डा आणि अर्शदीप सिंह यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement