Pakistan Squad for Asia Cup 2023: आशिया चषकसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, 2 वर्षांनंतर 'या' अष्टपैलू खेळाडूचे पुनरागमन; भारतासमोर असणार तगडे आव्हान

आशिया चषकासाठी पाकिस्तानने संघ जाहीर केला आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी 18 सदस्यीय आणि आशिया चषक स्पर्धेसाठी 17 सदस्यीय संघाची निवड करण्यात आली आहे. मात्र, अफगाणिस्तान वनडे मालिकेसाठी निवड झालेल्या सौद शकीलला आशिया चषक संघात स्थान मिळू शकले नाही. अष्टपैलू फहीम अश्रफचे वनडेत संघात पुनरागमन झाले आहे.

Asia Cup 2023: अफगाणिस्तानविरुद्धची आगामी वनडे मालिका आणि आशिया चषकासाठी (Asia Cup 2023) पाकिस्तानने संघ जाहीर केला आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी 18 सदस्यीय आणि आशिया चषक स्पर्धेसाठी 17 सदस्यीय संघाची निवड करण्यात आली आहे. मात्र, अफगाणिस्तान वनडे मालिकेसाठी निवड झालेल्या सौद शकीलला आशिया चषक संघात स्थान मिळू शकले नाही. अष्टपैलू फहीम अश्रफचे वनडेत संघात पुनरागमन झाले आहे. अश्रफ दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानकडून शेवटचा वनडे खेळला होता. फहीमने 31 एकदिवसीय सामन्यांमध्ये 218 धावा केल्या आहेत. तर त्याने 31 सामन्यात 23 विकेट्स घेतल्या आहेत. वास्तविक, आशिया कप 2023 हा 30 ऑगस्टपासून सुरू होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होणार आहे. पाकिस्तान आणि नेपाळचे संघ 30 ऑगस्टला आमनेसामने असतील. यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांशी दोन हात करतील. पाकिस्तानने तगडा संघ जाहीर करून भारतासमोर एक आव्हान उभे केले आहे.

पाकिस्तान संघ:

अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तैयब ताहिर, सौद शकील (फक्त अफगाणिस्तान मालिकेसाठी), मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, शादाब खान (उपकर्णधार), मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हरिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now