IND-W vs PAK-W, Asia Cup 2024 Live Score Update: पाकिस्तानने भारतासमोर ठेवले 109 धावांचे लक्ष्य, दीप्ती शर्माने घेतल्या तीन विकेट
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानच्या संपूर्ण संघाने 19.2 षटकांत केवळ 108 धावा केल्या. पाकिस्तानकडून सलामीवीर सिद्रा अमीन आणि फातिमा सना यांनी सर्वाधिक 25 धावा केल्या. टीम इंडियाकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
IND-W vs PAK-W, Asia Cup 2024: महिला आशिया चषक 2024 आजपासून सुरू झाला आहे. आशिया चषकाचा दुसरा सामना भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना डंबुला येथील रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. आशिया कपमध्येही टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध सहापैकी पाच सामने जिंकले आहेत. मात्र, गेल्या आशिया चषकातही टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान, पाकिस्तानची कर्णधार निदा दार हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानच्या संपूर्ण संघाने 19.2 षटकांत केवळ 108 धावा केल्या. पाकिस्तानकडून सलामीवीर सिद्रा अमीन आणि फातिमा सना यांनी सर्वाधिक 25 धावा केल्या. टीम इंडियाकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 109 धावा करायच्या आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)