Pakistan Cricket: मुलतान कसोटीतील लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान अॅक्शन मोडमध्ये! नवीन निवड समितीची केली घोषणा
या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. पीसीबीने नवीन निवड समिती जाहीर केली आहे. या निवड समितीमध्ये एका पंचाचेही नाव आहे.
England vs Pakistan 1st Test: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाला एक डाव आणि 47 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यातील पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. पीसीबीने नवीन निवड समिती जाहीर केली आहे. या निवड समितीमध्ये एका पंचाचेही नाव आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 पासून पाकिस्तान क्रिकेटमध्ये काहीही चांगले घडत नाही. अलीकडेच मोहम्मद युसूफ निवड समितीपासून वेगळा झाला होता. त्याचबरोबर आता बोर्डाने नवीन निवड समितीमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत. अलीम दार, आकिब जावेद, असद शफीक, अझहर अली आणि हसन चीमा यांना नव्या निवड समितीमध्ये स्थान मिळाले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)