IND vs PAK 5th Match: अक्षर पटेलच्या अचूक थ्रोने पाकिस्तानचे चाहते कोमात, काहीचे डोळे पाणावले तर कोणी पकडला माथा; पाहा व्हिडिओ
मिड-ऑनवर उभ्या असलेल्या अक्षर पटेलने अचूक थ्रो मारून त्रिफळा उडवताच, महिला चाहत्याच्या चेहऱ्यावर निराशा दिसून आली. त्याचे डोळे पाणावले आणि त्यानी कपाळाला हात लावला.
IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान सामना सुरू होण्यापूर्वी लोकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. दुबई क्रिकेट स्टेडियममध्येही आता तोच उत्साह दिसून येत आहे. खरं तर, 9व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हार्दिक पंड्याने 23 धावांवर बाबर आझमला बाद केले. इमाम उल हक सहाव्या चेंडूवर धावचीत झाला. त्याच्या धावबाद झाल्याबद्दल पाकिस्तानी चाहत्यांची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. मिड-ऑनवर उभ्या असलेल्या अक्षर पटेलने अचूक थ्रो मारून त्रिफळा उडवताच, महिला चाहत्याच्या चेहऱ्यावर निराशा दिसून आली. त्याचे डोळे पाणावले आणि त्यानी कपाळाला हात लावला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)