PAK Squad for ODI & T20I Series vs Australia: पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी कर्णधाराशिवाय संघ केला जाहीर, इमाद वसीम आणि मोहम्मद आमिरचे पुनरागमन

पीसीबीने एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. इमाद वसीम आणि मोहम्मद आमिर यांना एकदिवसीय मालिकेत किंवा टी-20 मालिकेत स्थान देण्यात आलेले नाही.

PAK Team (Photo Credit - X)

Pakistan National Cricket Team: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या आणि तितक्याच टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. पाकिस्तानला 4 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. यानंतर 14 नोव्हेंबरपासून दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पीसीबीने संघ जाहीर केला असला तरी कर्णधार कोण होणार याबाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही. पीसीबीने कर्णधाराशिवाय दोन्ही मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. पीसीबीने एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. इमाद वसीम आणि मोहम्मद आमिर यांना एकदिवसीय मालिकेत किंवा टी-20 मालिकेत स्थान देण्यात आलेले नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी पाकिस्तान संघ - आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अराफत मिन्हास, बाबर आझम, फैसल अक्रम, हरिस रौफ, हसीबुल्लाह (विकेटकीपर), कामरान गुलाम, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद इरफान खान, नसीम शाह , सॅम अयुब, सलमान अली आगा आणि शाहीन शाह आफ्रिदी.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी पाकिस्तान संघ- अराफत मिन्हास, बाबर आझम, हारिस रौफ, हसिबुल्लाह, जहाँदाद खान, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद इरफान खान, नसीम शाह, ओमेर बिन युसूफ, साहिबजादा फरहान, सलमान अली, शाहीन शाह आफ्रिदी, सुफयान मोकीम आणि उस्मान खान.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)