Mohammad Rizwan Tweet: 'आमचा हा विजय गाझामधील आमच्या बंधुभगिनींसाठी', श्रीलंकाविरुद्धच्या मोठ्या विजयानंतर मोहम्मद रिजवानचे ट्वीट व्हायरल

श्रीलंकेने उभारलेल्या 345 धावांचा डोंगर पाकिस्तानने 48.2 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात पार करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार पाकिस्तानचा विकेटकीपर मोहम्मद रिजवान राहिला.

विश्वचषकाच्या 48 वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवण्याचा पराक्रम पाकिस्तान संघाने केला आहे. मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये पाकिस्तानने श्रीलंकेचा (PAK Beat SL) सहा गडी राखून दणदणीत पराभव केला. श्रीलंकेने उभारलेल्या 345 धावांचा डोंगर पाकिस्तानने 48.2 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात पार करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार पाकिस्तानचा विकेटकीपर मोहम्मद रिजवान राहिला. दरम्यान श्रीलंकाविरुद्धच्या मोठ्या विजयानंतर मोहम्मद रिजवानचे ट्वीट व्हायरल होत आहे त्याने आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे की, "आमचा हा विजय गाझामधील आमच्या बंधुभगिनींसाठी होते. विजयात योगदान दिल्याबद्दल आनंद झाला. ते सोपे करण्यासाठी संपूर्ण टीम आणि विशेषत: अब्दुल्ला शफीक आणि हसन अली यांना श्रेय. हैद्राबादच्या लोकांचे अप्रतिम आदरातिथ्य आणि समर्थन यासाठी अत्यंत आभारी आहे."

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement