NZ vs BAN: न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्सने आयसीसीचे नियम तोडले, व्हिडिओमध्ये कैद झाली संपूर्ण कृती (Watch Video)
न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्सने (Glenn Phillips) सामन्याच्या तिसऱ्या दिवशी लाळेचा वापर करून आपल्या गोलंदाजीचा चेंडू चमकवण्याचा प्रयत्न केला. लाळेच्या वापरावर आयसीसीने (ICC) बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत फिलिप्स हे काम करून प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.
Glenn Phillips Viral Video: बांगलादेश आणि न्यूझीलंड (BAN vs NZ) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सिलहट क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एक अशी घटना घडली ज्याने सर्वांनाच धक्का बसला. खरेतर, न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्सने (Glenn Phillips) सामन्याच्या तिसऱ्या दिवशी लाळेचा वापर करून आपल्या गोलंदाजीचा चेंडू चमकवण्याचा प्रयत्न केला. लाळेच्या वापरावर आयसीसीने (ICC) बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत फिलिप्स हे काम करून प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. ग्लेन फिलिप्सने हे केले तेव्हा एहसान रझा आणि पॉल रायफल मैदानी पंच म्हणून उपस्थित होते. दोन्ही मैदानावरील पंचांनी या अष्टपैलू खेळाडूवर कोणतीही कारवाई केली नाही. ESPNcricinfo नुसार, आयसीसीने देखील या प्रकरणी बोलण्यास नकार दिला आहे. मैदानावर निर्माण होणार्या समस्यांवर सामना अधिकार्यांकडून कारवाई केली जाईल, असेही सांगण्यात आले. (हे देखील वाचा: Ajinkya Rahane आणि Cheteshwar Pujara ची कसोटी कारकीर्द अडचणीत, निवडकर्त्यांनी दिले मोठे संकेत)
पाहा व्हिडिओ
Did Glenn Phillips use saliva to shine the ball?🤔
.
.#BANvNZ pic.twitter.com/NjYGLkVt6S
— FanCode (@FanCode) November 30, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 30, 2023 11:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

