Nepal Women Won by 6 Wicket: नेपाळ महिला संघाने UAE चा 6 गडी राखून केला पराभव, समझाना खड़काची मॅच विनिंग खेळी
आशिया चषकाचा पहिला सामना नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि संयुक्त अरब अमिराती राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात नेपाळच्या महिला संघाने संयुक्त अरब अमिरातीचा सहा गडी राखून पराभव केला आहे. यासह नेपाळने आपले खाते उघडले आहे.
महिला आशिया चषक 2024 आजपासून (Asia Cup 2024) सुरू झाला आहे. आशिया चषकाचा पहिला सामना नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि संयुक्त अरब अमिराती राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात नेपाळच्या महिला संघाने संयुक्त अरब अमिरातीचा सहा गडी राखून पराभव (NEP Beat UAE) केला आहे. यासह नेपाळने आपले खाते उघडले आहे. तत्पूर्वी, नेपाळची कर्णधार इंदू बर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या युएई संघाने 20 षटकात 8 गडी गमावून 115 धावा केल्या. युएई कडून खुशी शर्माने सर्वाधिक 36 धावा केल्या. नेपाळकडून कर्णधार इंदू बर्माने सर्वाधिक तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळ संघाने अवघ्या 16.1 षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले. नेपाळकडून सलामीवीर समजना खडकाने सर्वाधिक नाबाद 72 धावांची खेळी केली. यूएई साठी, कविशा अगोडाने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)