Nepal Cricketer Sandeep Lamichhane Jail Term: बलात्कार प्रकरणात नेपाळ न्यायालयाचा मोठा निर्णय, स्टार क्रिकेटपटू संदीप लामिछानेला सुनावली आठ वर्षाची शिक्षा

आज झालेल्या सुनावणीनंतर नुकसानभरपाई आणि दंडासह 8 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्याची माहिती न्यायालयाचे अधिकारी रामू शर्मा यांनी दिली.

नेपाळ क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. नेपाळ संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात दोषी आढळला आहे. यावर नेपाळच्या कोर्टाने स्टार क्रिकेटर संदीप लामिछाने याला आठ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. शिशिरराज ढकल यांच्या खंडपीठाने आज सुनावणी केल्यानंतर नुकसानभरपाई आणि दंडासह 8 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली, या वृत्ताला न्यायालयीन अधिकारी रामू शर्मा यांनी दुजोरा दिला. काठमांडू जिल्हा न्यायालयाने आपला निकाल देत संदीपला दोषी घोषित केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now