PAK vs BAN 1st Test Day 4: मुशफिकर रहीमचा झेल सोडणे बाबर आझमला पडले महागात, कर्णधारने ड्रेसिंग रूममध्ये व्यक्त केला संताप; Watch Video

बांगलादेशकडून मुशफिकुर रहीमने 191 धावांची उत्कृष्ट खेळी केली. सामन्याच्या चौथ्या दिवशी पाकिस्तानला मुशफिकुर रहीमलाही बाद करण्यासाठी मोठी संधी मिळाली. पाकिस्तान संघाचा स्टार फलंदाज बाबर आझमने ही कॅच सोडत रहीमला जीवदान दिले.

Photo Credit - X

Pakistan National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेली पहिली कसोटी अनिर्णित राहण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पाकिस्तानच्या 448 धावांना प्रत्युत्तर देताना बांगलादेशने पहिल्या डावात जोरदार प्रत्युत्तर देत 500 हून अधिक धावा केल्या. बांगलादेशकडून मुशफिकुर रहीमने 191 धावांची उत्कृष्ट खेळी केली. सामन्याच्या चौथ्या दिवशी पाकिस्तानला मुशफिकुर रहीमलाही बाद करण्यासाठी मोठी संधी मिळाली. पाकिस्तान संघाचा स्टार फलंदाज बाबर आझमने ही कॅच सोडत रहीमला जीवदान दिले. बाबरने रहीमचा झेल सोडताच पाकिस्तान संघाचा कर्णधार शान मसूद रागाने लाल झाला. बाबरने हा झेल सोडला तेव्हा पाकिस्तान संघाचा कर्णधार शान मसूद मुख्य प्रशिक्षक जेसन गिलेस्पीसोबत ड्रेसिंग रूममध्ये बसला होता. बाबरने झेल सोडताच शान मसूद रागाने भडकला. तो गिलेस्पीशी रागाने बोलताना दिसला. शान मसूदचा संताप व्यक्त करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. या व्हिडिओवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement