SRH vs MI Live Toss Updates: मुंबईने हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
नाणेफेक जिंकून मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सनरायझर्स हैदराबाद संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरणार आहे.
आज आयपीएल 2023 चा 69 वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद (MI vs SRH) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सनरायझर्स हैदराबाद संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरणार आहे. सनरायझर्स प्लेऑफमधून बाहेर असताना, प्लेऑफच्या शर्यतीत स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी मुंबईला या सामन्यात विजयाची नोंद करावी लागणार आहे.
दोन्ही संघ
मुंबई इंडियन्स : इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, विष्णू विनोद, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय.
सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, उमरान मलिक, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार, नितीश रेड्डी.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)