आयपीएल च्या सीझन मधील Mumbai Indians ही एक लोकप्रिय टीम आहे. या टीमच्या होमग्राऊंड वरील गेम्सच्या तिकीटांची बुकिंग आता BookMyShow अ‍ॅप आणि वेबसाईट वर देखील उपलब्ध आहे. तुम्ही अ‍ॅप किंवा वेबसाईट वर जाऊन IPL वर क्लिक करू शकतात किंवा सर्च बार वर क्रिकेट सर्च करा. स्क्रिन वर तुम्हांला उपलब्ध असलेल्या सामन्यांची यादी मिळेल. वेगवेगळ्या पेमेंट ऑप्शन्सचा वापर करून तिकीट बूक करता येऊ शकते. ही तिकीट बुकिंग 2 एप्रिल पासून 4 एप्रिल पर्यंत उपलब्ध आहेत. MI family card holders साठी 4 ते 5 एप्रिल दरम्यान तिकीट उपलब्ध असतील. तर रजिस्टर युजर्स त्यांची तिकीटं 5 एप्रिल पासून 7 एप्रिल च्या संध्याकाळी 5 पर्यंत बूक करू शकतात.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)