MS Dhoni ने 2011 च्या वर्ल्डकपमधून Rohit Sharma ची केली होती हक्कलपट्टी, माजी भारतीय निवडकर्त्याने केला मोठा खुलासा (Watch Video)
रोहितची संघात निवड झाली नाही कारण तत्कालीन कर्णधार एमएस धोनीला (MS Dhoni) त्याच्या जागी पियुष चावलाला घ्यायचे होते.
2011 च्या विश्वचषकात रोहित शर्माची (Rohit Sharma) निवड न झाल्याबद्दल माजी भारतीय निवडकर्ता राजा वेंकट (Raja Venkat) यांनी मोठा खुलासा केला आहे. वेंकटने सांगितले की रोहितची संघात निवड झाली नाही कारण तत्कालीन कर्णधार एमएस धोनीला (MS Dhoni) त्याच्या जागी पियुष चावलाला घ्यायचे होते. तो म्हणाला की, काही काळ संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनाही रोहितला संघात घ्यायचे होते, पण जेव्हा धोनीने ही मागणी केली तेव्हा त्यांनीही त्याला पाठिंबा दिला. रोहित शर्माची त्यावेळी संघात निवड न झाल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले कारण तो एकदिवसीय संघाचा सातत्यपूर्ण भाग होता तसेच 2007 टी-20 विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता. 2011 च्या विश्वचषकात भारताने जिंकलेल्या पियुष चावलाने तीन सामने खेळले होते ज्यात त्याने चार विकेट घेतल्या होत्या. तथापि, यानंतर रोहित 2015 आणि 2019 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताचा महत्त्वाचा भाग राहिला, तर पियुष चावलाला संधी मिळाली नाही.
पहा व्हिडिओ