MS Dhoni New Record: एमएस धोनीने इतिहास रचला, 'हा' पराक्रम करणारा पहिला यष्टिरक्षक ठरला
रवींद्र जडेजाच्या चेंडूवर धोनीने पृथ्वी शॉला विकेटच्या मागे झेलबाद केले. यासह त्याने टी-20 मध्ये 300 शिकार पूर्ण केल्या. ही कामगिरी करणारा धोनी पहिला यष्टीरक्षक ठरला आहे. धोनीने टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 300 विकेट घेतल्या आहेत.
DC vs CSK, IPL 2024, Match 13: आयपीएल 2024 च्या 13व्या (IPL 2024) सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी (DC vs CSK) होत आहे. विशाखापट्टणम येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) इतिहास रचला. रवींद्र जडेजाच्या चेंडूवर धोनीने पृथ्वी शॉला विकेटच्या मागे झेलबाद केले. यासह त्याने टी-20 मध्ये 300 शिकार पूर्ण केल्या. ही कामगिरी करणारा धोनी पहिला यष्टीरक्षक ठरला आहे. धोनीने टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 300 विकेट घेतल्या आहेत. टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या इतर यष्टिरक्षकांबद्दल बोलायचे झाल्यास, पाकिस्तानचा कामरान अकमल या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत दिनेश कार्तिक तिसऱ्या, दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक चौथ्या आणि इंग्लंडचा जोस बटलर पाचव्या स्थानावर आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)