Mohammed Shami's World Cup Record: इंग्लंडचा 100 धावांनी पराभव करून भारताचा सहावा विजय; पहा मोहम्मद शमीचे विश्वचषकातील विक्रम

विश्वचषकात शमीची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. त्याने 13 सामन्यांत 14.07 च्या सरासरीने 40 विकेट्स घेतल्या आहेत.

मोहम्मद शमी (Photo Credit: PTI)

विश्वचषक स्पर्धेत भारताने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 229 धावा केल्या, प्रत्युत्तरात इंग्लंडचा संपूर्ण संघ 129 धावा करून बाद झाला. यासह भारताने विश्वचषकात सलग सहावा विजय संपादन केला. रोहित शर्माला त्याच्या 87 धावांच्या खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. मोहम्मद शमीने या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 7 षटकात 22 धावा देत 4 बळी घेतले.

विश्वचषकात शमीची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. त्याने 13 सामन्यांत 14.07 च्या सरासरीने 40 विकेट्स घेतल्या आहेत. विश्वचषकात तो प्रत्येक 17 व्या चेंडूवर सरासरीने एक विकेट घेतो. सक्रिय खेळाडूंमध्ये विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा तो भारतीय गोलंदाज आहे. विश्वचषकात झहीर खान आणि जवागल श्रीनाथ हे त्याच्यापेक्षा जास्त विकेट घेणारे एकमेव भारतीय आहेत. दोघांनी आपल्या नावावर 44-44 विकेट्स घेतल्या आहेत. (हेही वाचा: India Beat England, World Cup 2023: भारताचा इंग्लंडवर 100 धावांनी मोठा विजय, टीम इंडियाचा सेमी फायनलमध्ये प्रवेश)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement