LSG vs GT, IPL 2024 21st Match Toss Update: लखनौने गुजरातविरुद्ध नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार हे नक्की.
LSG vs GT, IPL 2024 21st Match: आयपीएल 2024 चा 21 वा सामना (IPL 2024) आज लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स (GT vs LSG) यांच्यात भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनौ येथे 7.30 वाजता खेळवला जाणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. लखनौ या सामन्यात सलग तिसरा विजय नोंदविण्याचा प्रयत्न करेल, तर गुजरात शेवटच्या सामन्यात पंजाबविरुद्धच्या पराभवाची जखम विसरण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार हे नक्की. दरम्यान, लखनौने गुजरातविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), देवदत्त पडिककल, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, यश ठाकूर, नवीन-उल-हक, मयंक यादव
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (कर्णधार), शरथ बीआर (विकेटकीपर), साई सुधारसन, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, दर्शन नळकांडे, मोहित शर्मा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)